Powered By Blogger

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

जैन ग्रंथानुसार ब्राम्हणांची उत्पत्ती


जैन ग्रंथानुसार ब्राम्हणांची उत्पत्ती



 वैदिक परंपरेत ब्राम्हणांची उत्पत्ती ब्रम्ह्याच्या मुखातून झाली असे मानण्यात येते. असे होणे शक्यच नाही हे कोणताही विचारी माणूस म्हणेल. महात्मा फुले यांनी या संदर्भात असे म्हंटले आहे मग ब्रम्ह्याचे मुख चार दिवस विटाळसे   झाले होते काय? ब्राम्हण त्यातून वांतीबरोबर बाहेर आले काय?



  ब्राम्हणांच्या उत्पत्तीची जैन थेअरी वेगळी तर आहे, शिवाय ती एकदम लॉजिकल आहे.



 २४ तीर्थंकरांपैकी   पहिले तीर्थंकर ऋषभ हे होत. त्यांना जैन परंपरे बरोबर वैदिक परंपरेतील पुराणांनी सर्व क्षत्रियांचे पूर्वज मानले आहे. त्यांचा मोठा मुलगा भरत हा भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होता. त्याने सर्व ज्ञात प्रदेश जिंकून तेथे आपली सत्ता स्थापन केली.  आपल्या विजयानिमित्त त्याने  अन्नदान करायचे ठरवले.  पण ते स्वीकारण्यास कोणी तयार होईना. कारण  असे कांही फुकट  घेणे त्याना  बरोबर वाटले नाही.



 त्यावेळी तेथे कांही 'नंतर' आलेले लोक होते. चक्रवर्ती भरताने या नंतर आलेल्या लोकांतून याचकांचा एक वर्ग तयार केला.त्यांनीकोणताही काम-धंदा न करता केवळ दान-दक्षिणे वरच आपली गुजराण करावी अशी भरताची इच्छा होती. या वर्गास ब्राम्हण असे नाव मिळाले.



 भरताने असा नवा वर्ग तयार केल्याची माहिती तीर्थंकर ऋषभांना मिळाली. त्यावेळी ते हिमालयात तप करत होते. पुढे भरत त्यांना भेटायला गेला असता ते भरतास म्हणाले, असा वर्ग तयार करून तू फार मोठी चूक केली आहेस. हेच लोक पुढे पृथ्वीवर भेदाभेद माजवतील आणि मी सांगितलेल्या धर्माला कट्टर विरोध करतील. त्यांनी सांगितले ते पुढे खरे ठरले.



संदर्भ:

 १. आदिपुराण: आचार्य जिनसेन

 २. जैन आणि हिंदू: ले. तात्या केशव चोपडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा